रोहीत अलोने
माझे वडील गेल्या 25 वर्षांपासून देशदूत समूहात सेवेत आहेत, त्या अर्थाने मीही देशदूत परिवाराचा सदस्य आहे. मी पुण्यात पीव्हीजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. आता मी Atlas Copco या कंपनीत पुणे येथे डिझाईन इंजिनिअर आहे. पुण्यात शिक्षण घेताना कॉलेज फी, हॉस्टेल, मेस फी असा खूप खर्च होता. मात्र अभियांत्रिकीच्या चारही वर्षाला मला देशदूत चॅरिटेबल ट्रस्टकडून शिष्यवृत्ती मिळाली. यामुळे माझ्या शैक्षणिक खर्चाचा बराचसा भार हलका झाला. माझे उच्च शिक्षण पूर्ण होण्यात देशदूत चॅरिटेबल ट्रस्टची मोठी मदत झाली आहे. मी कायम देशदूत परिवाराच्या ऋणात राहू इच्छितो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्याचा देशदूत परिवाराचा शिरस्ता कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.
रोहीत अलोने
Main
2020-12-02T05:52:17+00:00
रोहीत अलोने
http://deshdootcharity.org/testimonials/%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%87/