Mr Sachin Mandlik

Mr Sachin Mandlik

एका छोट्याशा शंभर स्क्वेअर फूटाच्या घरात आम्ही तीन भावंडे आणि आई - वडिल असा परिवार राहत होतो . घरात वडिल एकटेच कमविणारे . गावी असलेल्या शेतीचा खर्च , घराचे भाडे , घरखर्च व त्यात आमच्या शिक्षणाचा खर्च अशा अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत आमच्या शिक्षणाला सुरूवात झाली . मोठ्या भावाची जुनी पुस्तके आणि दप्तर वापरायचे , शाळेत २ कि.मी. पर्यंत पायी चालत जायचे असा शक्य तितका खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो . परंतु दरवर्षी शैक्षणिक फी भरणे हे आमच्यापुढे असलेले मोठे संकट असायचे.

अशातच " देशदूत चॅरिटेबल ट्रस्ट " आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांनी देऊ केलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती खरोखर आमच्यासाठी संजीवनी ठरली . याच शिष्यवृत्तीच्या आधारावर माझा पहिली ते दहावी आणि नंतर कॉलेजपर्यंतचा प्रवास सुखकर झाला . पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाऊंटटची परीक्षा देखील पास झालो आणि आज पुण्यातील एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे . याचे श्रेय खरोखरदेशदूत चॅरीटेबल ट्रस्ट " ला दिले पाहिजे.

आज शैक्षणिक खर्च कित्येक पटींनी वाढला आहे . माझ्यासारख्या अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना हा खर्च न परवडणारा आहे . अशा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या मार्फत आर्थिक हातभार लावण्याचे कार्य " देशदूत चॅरिटेबल ट्रस्ट " आजही अविरत करत आहे . त्यांच्या या प्रयत्नांना माझा सलाम !

Mr Sachin Mandlik

Main
2020-12-02T05:53:27+00:00

Mr Sachin Mandlik

एका छोट्याशा शंभर स्क्वेअर फूटाच्या घरात आम्ही तीन भावंडे आणि आई - वडिल असा परिवार राहत होतो . घरात वडिल एकटेच कमविणारे . गावी असलेल्या शेतीचा खर्च , घराचे भाडे , घरखर्च व त्यात आमच्या शिक्षणाचा खर्च अशा अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत आमच्या शिक्षणाला सुरूवात झाली . मोठ्या भावाची जुनी पुस्तके आणि दप्तर वापरायचे , शाळेत २ कि.मी. पर्यंत पायी चालत जायचे असा शक्य तितका खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो . परंतु दरवर्षी शैक्षणिक फी भरणे हे आमच्यापुढे असलेले मोठे संकट असायचे. अशातच " देशदूत चॅरिटेबल ट्रस्ट " आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांनी देऊ केलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती खरोखर आमच्यासाठी संजीवनी ठरली . याच शिष्यवृत्तीच्या आधारावर माझा पहिली ते दहावी आणि नंतर कॉलेजपर्यंतचा प्रवास सुखकर झाला . पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाऊंटटची परीक्षा देखील पास झालो आणि आज पुण्यातील एका नामवंत कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे . याचे श्रेय खरोखर “ देशदूत चॅरीटेबल ट्रस्ट " ला दिले पाहिजे. आज शैक्षणिक खर्च कित्येक पटींनी वाढला आहे . माझ्यासारख्या अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना हा खर्च न परवडणारा आहे . अशा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या मार्फत आर्थिक हातभार लावण्याचे कार्य " देशदूत चॅरिटेबल ट्रस्ट " आजही अविरत करत आहे . त्यांच्या या प्रयत्नांना माझा सलाम !